ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी वेधले लक्ष..!

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी वेधले लक्ष..!

प्रकाशन: 07 Jul 2022 03:32 PM
वाचन संख्या 112

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : वैभववाडी तालुका तहसील कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध विभागाच्या कामाबाबत व सध्या चालू असलेल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा बैठक पार पडली.या बैठकीत भारतीय जनता पार्टी भटके व विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सडूरे शिराळे श्री नवलराज काळे यांनी ग्रामीण भागातून शहराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधले. ही बैठक 6 जुलैला संपन्न झाली.

आमदार नितेश राणे


त्यामध्ये 8 जून 2022 रोजी वैभववाडी ते सडूरे शिराळे कुर्ली रस्त्यावरील खड्डे व झाडी मारण्याकरिता संबंधीत अधिकाऱ्या कडे विचारणा केली असता निधीचा तुटवडा आहे काम होऊ शकणार नाही अशा प्रकारची उत्तर देण्यात आली होती. त्याबद्दल या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यास विचारणा केली असता त्यांनी निधीच्या कमतरतेमुळेच सदर काम होऊ शकले नाही असं सांगितल्यावर त्यावर आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्यात निधीचा तुटवडा पडत होता परंतु आता आमचे सरकार आहे येणाऱ्या काळात निधीचा तुटवडा पडणार नाही आवश्यक ते प्रस्ताव इस्टिमेट करून माझ्याकडे सुपूर्त करा सर्व कामे मार्गी लावले जातील. कामात वेळ काडूपणा, कामचुकारपणा केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची खैर केली जाणार नाही अशा प्रकारचा सज्जड दम आमदार नितेश राणे यांनी दिला. व सडूरे शिराळे कुर्ली रस्ता दुरुस्तीबाबत योग्य प्रस्ताव व इस्टिमेट करून देण्याच्या सूचना आमदार यांनी सदर बैठकीत केल्या.सदर रस्त्याची दुरवस्था दूर झाल्यास सडुरे शिराळे कुर्ली सहित अरूळे निमअरूळे सांगुळवाडी गावातील विद्यार्थ्यांना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आमदार नितेश राणे यांनी या विषयात लक्ष घातल्यामुळे त्यामुळे वैभववाडी सडूरे शिराळे रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप वैभववाडी तालुकाध्यक्ष नासिर काझी, तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक यादव, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,भाजप जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, माजी उपसभापती अरविंद रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे नगराध्यक्षा नेहा माईंकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत,भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा सल्लागार माजी उपसभापती अंबाजी हुंबे, महिला तालुका अध्यक्ष प्राची तावडे, भाजप भटक्या विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका महिला शहराध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती सुंदरी निकम,जिल्हा उपाध्यक्ष बंड्या मांजरेकर, रावराणे व इतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते संबंधित सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स