मस्त चाललंय तुमचं ; भाजप शहर प्रभारी विजय केनवडेकर यांची आमदार व प्रशासनावर टीका.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या नाले सफाई व गटारे तुंबून पाणी साचणे या मुद्द्यावर शहर भाजपा प्रभारी विजय केनवडेकर यांनी प्रशासन व आमदारांवर प्रसिद्धीपत्राद्वारे जोरदार टीका केली आहे.
भाजपा मालवण शहराच्या वतीने माजी खासदार निलेश राणे (भाजपा युवा नेते) मालवण शहराच्या प्रश्नाबाबत नगरपालिकेला भेट देणार या बातमीमुळेच आमदार वैभव नाईक यांनी मालवणात येऊन मुख्याधिकारी व ठेकेदाराला धमकावण्याची नौटंकी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप विजय केनवडेकर यांनी केला आहे. पावसाळ्याच्या आधी मालवण शहरातील व्हाळी व गटारे खोदकाम लवकरात लवकर केली पाहिजे म्हणून भाजपा नगरपालिकेत वारंवार मागणी करत होते. पण आमदार त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांना घेऊन पर्यटन महोत्सव करण्यास मग्न होते. मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहूनच व्हाळी व गटारे ठेकेदाराकडून साफ करून घ्यावीत ही मुख्यता मागणी असताना दहा मिनिटांसाठी फोटो सेशन करण्यासाठीच एका साइटवर जाऊन व्हाळीचे निरीक्षण केले व काम चांगल्या प्रकारे सुरू आहे . असे प्रसिद्ध देऊन एसी केबिन मध्ये सुखरूप जाऊन बसले . असताना प्रशासनाला धारेवर धरत कामाला लावण्याचे धारिष्ट आमदारांनी दाखवले नाही .
उलटपकी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी वेळोवेळी मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागातील थोडीफार कामे व्हावीत म्हणून मुख्याधिकाऱ्यांची तळी उचलून पाठराखण करत राहीले
मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाहणे आवश्यक असताना प्रभागापुरतीच पुरतीच कामे करून मुख्याधिकाऱ्याचा चुका डोळे आड करण्याचा प्रयत्न पदाधिकारी करत होते .मालवण शहरातील वर्षभर कचऱ्याच्या प्रश्नाबाबत भाजपा आवाज उठवत असताना ठेकेदाराला कधीही दंडात्मक कारवाई करण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी धारिष्ट्य दाखवले नाही .
आमदारांच्या समोर ठेकेदार कामगार पुरवत नाहीत असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी लमाणी कामगार देऊ का असे विचारून आमदारांनी मुख्याधिकाऱ्यांना पाठीशी घातले होते .आता हेच आमदार ठेकेदारावर कारवाई करा म्हणून सांगत आहेत . ठेकेदाराचे बिल अदा करून झाले आहे. ठेकेदारावर कारवाई करून यांचा जनतेला काय फायदा होणार आहे . हे तरी आमदारांनी स्पष्ट करावे. ज्याप्रमाणे भुयारी गटार ठेकेदाराला महाराष्ट्रात काम करू देणार नाही अशी शिवगर्जना करणारे आमदार त्याच ठेकेदाराला त्याचे उर्वरित बिल देऊन टाका असे प्रशासनाला सांगत होते .हे पण जनतेने पाहिले आहे .भाजपाचे आवाहन आहे की भुयारी गटाराचा ठेकेदार तसेच कचरा उचलणारा ठेकेदार व व्हाळी व गटार साफ करणारा ठेकेदार यांची चौकशी करून त्यांचा कामाचे जनते कडून ऑडिट करून यांच्यावर कारवाई करूनच दाखवावीच. प्रशासनाला ठेकेदाराला जनतेच्या पुढ्यात धमकावून शेरेबाजी करून प्रसिद्धी घेण्यापेक्षा कारवाई करूनच दाखवावी.
त्याचबरोबर सफाई कामगार, नगरपालिके मधील ठेक्यातील कर्मचारी यांचा पगार ठेक्यांमध्ये नमूद केल्याप्रमाणे मिळतो की नाही हे पण पहावे .कंत्राटी सफाई कामगारांचा दीड दीड वर्ष पी.एफ भरलेला नसताना ठेकेदारांची बिले कशी काढली याची पण पूर्ण चौकशी करून घ्यावी.
मालवण नगरपालिकेचा अनागोंदी कारभार व सध्याची नौटंकी पहाता शहरातील जनतेच्या सोयींकडे दुर्लक्ष करुन “मस्त चाललंय तुमचं” असेच जनतेला म्हणावे लागत असल्याचा आरोप विजय केनवडेकर यांनी केला आहे.
हा सर्व अनागोंदी कारभार जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपाच्या वतीने माजी खासदार व युवा नेते निलेश राणे, सोमवारी 11 जुलैला नगरपालिकेत येऊन जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारत झाडाझडती घेणार असल्याचे भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)