ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भोगलेवाडीत स्वामी विश्व संकुल स्टाॅपच्या नामफलकाचे झाले अनावरण…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भोगलेवाडीत स्वामी विश्व संकुल स्टाॅपच्या नामफलकाचे झाले अनावरण…!

प्रकाशन: 07 Jul 2022 03:21 PM
वाचन संख्या 100

सरपंच मानसी पालव यांनी केले अनावरण…!

मसुरे | प्रतिनिधी :
बागायत भोगलेवाडी मालवण रस्त्यावरती भोगलेववाडी चढण या ठिकाणी येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट श्री सुरेश बोभाटे यांच्या प्रयत्नाने येथील ग्रामस्थांची गरज ओळखून स्वामी विश्व संकुल स्टॉप येथे बस थांब्याच्या नाम फलकाचे अनावरण बिळवस सरपंच सौ मानसी पालव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


या प्रसंगी ॲडव्होकेट श्री सुरेश बोभाटे,लक्ष्मण पालव, अरविंद गांवकर, घाडीगावकर व संकुलातील इतर सभासद हजर होते. या परिसरातील ग्रामस्थांना स्वामी विश्व संकुल येथे एस टी थांब्याची जरुरी होती त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट श्री सुरेश बोभाटे यांच्या विशेष प्रयत्नाने सर्व संबंधित अधिकारी वर्गाशी विचारविनिमय करून या ठिकाणी एसटी थांबा मंजूर करून घेतला व या एसटी थांब्याच्या नाम फलकाचे अनावरणही नुकतेच करण्यात आले. येथील ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. सुरेश बोभाटे यांच्या या सामाजिक कार्याचे बिळवस सरपंच सौ मानसी पालव यांनी विशेष कौतुक केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स