रातोरात छत्रपतींचा पुतळा स्थापन ; कोणी व कसा केला याबद्दल अनभिज्ञता.
कणकवली | ब्युरो न्यूज : नवीन मुंबई गोवा महामार्ग बांधणी दरम्यान गेले वर्षभर चर्चेत व स्थापना निश्चितीच्या प्रतिक्षेत असलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नवीन पुतळा लगतच्या जागेत बसविण्यात आला आहे. बुधवारी एका रात्रीत हा पुतळा नवीन जागेत स्थापन करण्यात आला आहे. पुतळा स्थलांतरणाचा वाद कायम असताना हा नव्याने पुतळा उभारण्यात आला आहे.
गेले काही दिवस मागणी होत असलेल्या श्री.दीप नाईक यांच्या फॅब्रिकेशनच्या जागेत एका रात्रीत हा पुतळा बसविण्यात आला आहे. मात्र तूर्तास तरी जुना पुतळा जागेवरच असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील सर्विस रोडच्या मधोमध येणाऱ्या पुतळा स्थलांतराचा विषय गेले काही महिने सुरू होता. याबाबत तत्कालीन पालकमंत्र्यांनी सहा महिन्यापूर्वी बैठक घेऊन महिनाभरात पुतळा स्थलांतर होईल असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. या पुतळ्यामुळे सर्विस रोडच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होत असल्याने पुतळा स्थलांतर तातडीने करण्याची मागणी सुरू होती. अखेर बुधवारी एका रात्रीत नवीन पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा कोणी बसवला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)