ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ट्रक - मोटरसायकल अपघातात मोटरसायकलस्वार जखमी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ट्रक - मोटरसायकल अपघातात मोटरसायकलस्वार जखमी.

प्रकाशन: 07 Jul 2022 08:35 AM
वाचन संख्या 40

बांदा |राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा – पानवळ येथील गोगटे – वाळके महाविद्यालयासमोर ट्रक व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला. नरेशकुमार गिरिधारीलाल ज्योतिषी (३५, रा. राजस्थान, सध्या रा. बांदा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बांदा पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नरेशकुमार हा मोटरसायकलने (एमएच ०७ एडी ३०३८) आज दुपारी दोडामार्गहून बांद्याच्या दिशेने येत होता. पानवळ कॉलेज समोर बांद्याहून मोरगावकडे कोंबडी खाद्य घेऊन जाणार्‍या ट्रकशी (एमएच ०७ सी ६७०१) त्याची जोरदार धडक बसली. या अपघातात ट्रकला आदळून तो रस्त्यावर कोसळला. स्थानिकांनी त्याला तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.


वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. नरेशकुमारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून २२ टाके पडले आहेत. त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, काँस्टेबल विठोबा सावंत, दिप्ती गवस यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघाताची फिर्याद ट्रकचालक आनंदराव आप्पा माने (३४, रा. जत, याने दिली असून मोटरसायकल चालक नरेशकुमार ज्योतिषी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स