ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महावितरणचे कंत्राटी वायरमन आनंद मिराशी यांच्या परिवाराला १ लाखाची मदत..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महावितरणचे कंत्राटी वायरमन आनंद मिराशी यांच्या परिवाराला १ लाखाची मदत..!

प्रकाशन: 06 Jul 2022 11:00 PM
वाचन संख्या 95

आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश..

माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी वर्ग

आचरा | प्रतिनिधी : दोन महिन्यांपूर्वी, विजेचा भीषण धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी वायरमन श्री. आनंद कृष्णा मिराशी यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून १ लाख रु.चे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे.त्याबद्दल उद्धवजी ठाकरे, व ना. एकनाथ शिंदे यांचे आमदार वैभव नाईक यांनी आभार मानले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे आचरा उपविभाग येथे कार्यरत असलेले कंत्राटी वायरमन व आचरा, वरचीवाडी येथील रहिवासी श्री. आनंद कृष्णा मिराशी(वय २२) हे विद्युत पोलवर वीज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या अपघाती मृत्यूने मिराशी कुटुंबावर मोठे संकट ओढवले, श्री. मिराशी यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची व हालाखीची असून त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता.त्यामुळे मिराशी कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मानवतावादी दृष्टिकोनातून एक विशेष बाब म्हणून १ लाख रु. एवढे आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. हे आर्थिक सहाय्य सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले असून त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. लवकरच सदर रकमेचा धनादेश आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

यावेळी उपस्थित शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे,आचरा विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर, शिवसेनेचे जेष्ठ नेते विनायक परब, आचरा उप विभाग प्रमुख जगदीश पांगे, शहर प्रमुख राजु नार्वेकर आचरा मच्छीमार नेते नारायण कुबल आचरा माजी सरपंच शाम घाडी माजी सरपंच चंदन पांगे, नरेश तारकर, निलेश गावडे,सलमान मुजावर.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स