<em>मनसे युवा नेते अमित राज ठाकरे यांची राणेंच्या ओमगणेश निवासस्थानी भेट..!</em>
आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत.!
वैभववाडी | नवलराज काळे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना आज कणकवली येथे राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट दिली. भाजपचे आमदार युवा नेते नितेश राणे यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर अमित ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,किर्तिकुमार शिंदे,प्रशांत कानोजिया आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)