<em>पळसंब ग्रामपंचायत येथे ग्रामसभा संपन्न…!</em>
विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याबाबतचा ठराव मंजूर…!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या
मालवण तालुक्यातील पळसंब येथे आज दिनांक ०६/०७/२०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा श्री.चंद्रकांत गोलतकर( सरपंच ) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .
यावेळी ग्रामसेवक श्री.अमित कांबळी,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री.सुभाष तर्फे,अंगणवाडी सेविका,श्रीम.प्रिया चिंदरकर,निकिता पुजारे,तनुजा रविकांत परब (आशा सेविका) सौ. उत्कर्षा सावंत,मृणाली पुजारे (CRP),अमिता परब ,किशोरी सावंत,पल्लवी सावंत,विद्या पळसंबकर,रत्नप्रभा पळसंबकर,दर्शना सावंत इत्यादी ग्रामस्थ ग्रामसभेस उपस्थित होते या सभेमध्ये विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला त्यानंतर ग्रामसेवक यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपन्न केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)