ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आता पुन्हा एकदा सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून येणार?
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आता पुन्हा एकदा सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून येणार?

प्रकाशन: 06 Jul 2022 04:15 PM
वाचन संख्या 150

राज्य सरकारकडून लवकरच घोषणेचे संकेत..

मुंबई | ब्युरो न्यूज : आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि सरंपच यांची निवड थेट जनतेमधून होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने याला स्थगिती देत पूर्वीची पद्धत पुन्हा लागू केली होती. ज्यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडला जायचा मात्र आता नवे सरकार सत्तेत येताच हा नियम बदलण्याची शक्यता आहे. आता थेट सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही जनतेमधून होऊ शकते. याबाबत भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. नगराध्यक्ष जनतेमधून न निवडता सदस्यांमधून निवडला गेल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव असतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अस्थिर बनतात. त्यामुळे नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेमधूनच व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स