ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
हडपीड स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हडपीड स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव..!

प्रकाशन: 05 Jul 2022 01:08 PM
वाचन संख्या 30

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे १३ जुलैला गुरूपौर्णिमा उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५ ते ६ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य मुर्तीवर महाअभिषेक, सकाळी ७ ते ८ श्री गणेश पुजन,स्वत्ती पुण्यवाचन,
सकाळी ८ ते ९ श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी भक्तांसोबत नित्य पुजा, सकाळी: ९ ते १० श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण,
सकाळी: ११ ते १२ श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती,
सकाळी १२ वाजता श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड तर्फे दहीबाव दळवी वाडीतील अत्यंत गरीब महिला सौ.पुजा हेमंत दळवी यांना त्यांच्या उदरनिर्वाहानासाठी शिलाई मशीन देण्यात येईल तसेच त्यांचा मुलगा कु.साहील हेमंत दळवी ह्याला संस्थेच्या वतीने त्याच्या शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याचा शिक्षणाचा सर्व खर्च करण्यात येणार आहे.
दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद होणार आहे. रात्री स्थानिक भजने होतील. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड विश्वस्त आणि
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ हडपीड गाव समिती यांच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स