राजा शिवाजी विद्यालय विलवडे शाळेस माजी विद्यार्थ्यांन कडून वाहन सुपुर्द..!
बांदा | राकेश परब :
शाळेचे माजी विद्यार्थी काैतुकास पात्र आहेत. पंचक्रोशीतील सामान्य कुटुंबियांतील विद्यार्थांना या वाहनाने वेळेत प्रवास करणे सोयीचे होणार आहे. शाळेच्या विकासासाठी आम्ही पावले उचलेली आहे.त्यासाठी माझी विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळत आहे. असे गाैरव उद्गागार विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) अध्यक्ष संभाजी दळवी यांनी कार्यक्रमात बोलताना काढले.
राजा शिवाजी विद्यालय,विलवडे हायस्कूलमध्ये ‘माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी’ आयोजित ‘वाहन लोकार्पण सोहळा’ उत्साहात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील सर्व सरपंच व मान्यवरांच्या उपस्थितीत ऐतिहासिक लोकार्पण सोहळा उद्घाटन संस्था अध्यक्ष संभाजी दळवी व सचिव सुर्यकांत दळवी यांच्या हस्ते मोठ्यात थाटात संपन्न झाला.
विलवडे बरोबरच वाफोली, सरमळे नांगरतास, भालावत, कोनशी, तांबोळी या पंचक्रोशीतून दूरवरून येणारे विद्यार्थी आणि त्यांची येण्या जाण्यासाठी करावयाची लागणारी धडपड आणि गैरसोय लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं यासाठी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी संघटनेच्या माध्यमातून नवीन चार चाकी वाहन खरेदी केले आणि शाळेला भेट दिली. यात सर्वाधिक योगदान दिले ते जया दळवी,संदीप दळवी, गिरीश दळवी यांनी कै. पांडुरंग शिवराम दळवी यांच्या स्मरणार्थ या वाहन खरेदीसाठी सर्वाधिक दोन लाखाचा निधी स्वतः त्यांनी आपल्या परिवाराकडून दिला.
यावेळी विलवडे सरपंच रावजी दळवी, जेष्ठ शिक्षकतज्ञ राजाराम दळवी,तांबुळी सरपंच अभिलाष देसाई,माजी उपसभापती कृष्णा सावंत,विनायक दळवी, विलवडे पतसंस्था अध्यक्ष विलास गावडे, बांदा केद्रशाळेचे जेष्ठ शिक्षिका सरोज नाईक, भालावल माजी सरपंच रमेश परब,माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष रोहिदास दळवी, उपाध्यक्ष समीर गावडे, सचिव रुपेश परब, खजिनदार जयश्री दळवी, सरमळे मुख्याध्यापक शरद गाबित, भालावल मुख्याध्यापक कोठावळे, बांदा जेष्ठ शिक्षिका कल्याणी नाईक, जनार्दन गावडे, परेश धर्णे, गोपाळ दळवी, आनंद दळवी, देऊ दळवी अनेक आजी-माजी विद्यार्थी सह ग्रामस्थ, शिक्षक वृंद, पालकवर्ग सह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक स्कूल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, स्वागत व आभार मुख्याध्यापक एन.एल.सावंत यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)