ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>विजय केनवडेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व शासन यांच्या समन्वयक समिती सदस्यपदी निवड..!</em>

<em>विजय केनवडेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व शासन यांच्या समन्वयक समिती सदस्यपदी निवड..!</em>

प्रकाशन: 03 Jul 2022 05:31 PM
वाचन संख्या 81

कोकणातील उद्योजकांचे प्रश्न व त्यासंबंधी प्रश्न सोडवण्यामध्ये विशेष योगदान..!

मालवण | प्रतिनिधी :
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये कोकणातील उद्योजकांचे प्रश्न व त्यासंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे विजय केनवडेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व शासन यांच्या समन्वयक समिती वरती सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महाराष्ट्राच्या पर्यटन समितीचे अध्यक्ष पद केनवडेकर यांनी भूषविले असून व्यावसायिक पर्यटन परिषद सिंधुदुर्गात घेऊन यशस्वी केली होती.चेंबरची गव्हर्नर कॉन्सिलची सभा सिंधुदुर्गात घेऊन महाराष्ट्रातील उद्योजकांचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वेधले होते. चेंबरची दिल्ली येथे होणारी केंद्रीय मंत्री व खासदारां समवेत होणारी गव्हर्नर कौन्सिल मिटिंग माजी अध्यक्ष श्री शंतनू भडकमकर व मा. संतोष म् मंडलेजा यांच्या नेतृत्वाखाली मा. सुरेश प्रभू माजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या सहकार्याने दिल्ली येथे सभा यशस्वी करण्यात विजय केनवडेकर यांनी विशेष प्रयत्न केले होते . चेंबरच्या सर्व उपक्रमात भाग घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वेगळा ठसा उमटवण्याचा वेळोवेळी केनवडेकर यांनी प्रयत्न केला आहे.
लघु सुष्म मध्यम उद्योगातील केंद्र सरकारमधील असणाऱ्या विविध योजना व्यापारी उद्योजकांमध्ये पोहोचवण्याचे काम व दलित चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत वंचित समाजातील उद्योजकांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना कोकणात मा. नारायणराव राणे केंद्रीय लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय कॅबिनेट मंत्री यांच्या सहकार्याने कोकणात वेगवेगळे उद्योगांना चालना देणारे व त्याचा फायदा सर्व उद्योजकांना होण्यासाठी विशेष प्रयत्न केनवडेकर करत आहेत याच कामाची दखल घेऊन मा. ललित गांधी महाराष्ट चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष यांनी विजय केनवडेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या समितीवर विशेष नेमणूक केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स