ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला मुदत वाढ..!</em>

<em>पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला मुदत वाढ..!</em>

प्रकाशन: 02 Jul 2022 05:14 PM
वाचन संख्या 59

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन, मालवण (3010) येथे फर्स्ट इयर डिप्लोमा तसेच डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा, या अभ्यासक्रमांसाठी सुविधा केंद्र (Facilitation Center) सुरु आहे. विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचा आहे. फर्स्ट इयर डिप्लोमासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.०७ जुलै पर्यन्त वाढविण्यात आली असून डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी अंतिम मुदत दि. ०८ जुलै आहे. ऑनलाइन पद्धतीमध्ये मध्ये E-Scrutiny व Physical E-Scrutiny असे दोन पर्याय आहेत. कोविड-१९ च्या प्रादुर्भाव थांबवण्यासाठीच्या उपाययोजना मध्ये सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी टाळणे या साठी E-SCRUTINY या पर्यायचा निवड करणे अशी सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती करण्यात येत आहे. Physical Scrutiny या पर्याय मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरून ,प्रिंट घेऊन सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून निश्चित करणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याच्या दाखल्या ऐवजी जन्म प्रमाणपत्र सादर करता येणार आहे .
शासकीय तंत्रनिकेतन मालवण संस्थेमध्ये एकूण ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह १.स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), २. संगणक (Computer) अभियांत्रिकी (प्रवेश क्षमता -६०) , ३ विद्युत (Electrical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), ४. अणुविद्युत (Electronics & Communication) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), ५. यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०) व ६. अन्न तंत्रज्ञान (Food Technology) (प्रवेश क्षमता -२०) या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रियेसाठी विहित मुदतीत प्रवेश अर्ज सुविधा केंद्राचा (FC 3010) लाभ घेण्यात यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले आहे.अधिक महितीसाठी प्रा.डी.एन.गोलतकर-9764513133, डॉ. वाय.व्ही.महाडीक-9423682846, यांच्याशी संपर्क साधावा.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स