पळसंब विठ्ठल रखुमाई मंदिरात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आषाढी एकादशी सोहळा..!
चिंदर/विवेक परब :
प्रतिवर्षा प्रमाणे श्री विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरची वाडी येथे आषाढी एकादशी सोहळा रविवार १० जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८.०० वाजता मूर्तीवर अभिषेक, दुपारी ११.०० वाजता कृषी विषयक मार्गदर्शन शिबीर, सायंकाळी ३.०० वाजता भजने व दिंडी कार्यक्रम, तरी भक्त भाविंकानी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब वरचीवाडी यांच्या कडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)