ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
काळसे गावातील हायस्कूल , प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप..!

काळसे गावातील हायस्कूल , प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप..!

प्रकाशन: 01 Jul 2022 02:41 PM
वाचन संख्या 133

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था व संदेश युवा प्रतिष्ठान यांचा उपक्रम…!

चौके | प्रतिनिधी :
जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था ठाणे व संदेश युवा प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे हायस्कूलच्या १८१ विद्यार्थ्यांना तसेच काळसे गावातील ४ प्राथमिक शाळांतील पहिली ते चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.
माजी जि. प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत , माजी बांधकाम सभापती संतोष साटविलकर, कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती राजू पेडणेकर यांच्या हस्ते बुधवार दिनांक २९ जून रोजी वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष योगेश राऊळ , सचिव केशव सावंत , खजिनदार दाजी परब , संचालक राजन प्रभु , सेवानिवृत्त तहसीलदार शरद गोसावी , दादा नाईक मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स