ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विद्यार्थी रमले बांधावरच्या शाळेतील भातशेतीत.!(विशेषवृत्त)

विद्यार्थी रमले बांधावरच्या शाळेतील भातशेतीत.!(विशेषवृत्त)

प्रकाशन: 01 Jul 2022 04:27 PM
वाचन संख्या 197

मसुरे |प्राजक्ता पेडणेकर (विशेषवृत्त) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा ओटव नांदगाव व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा,सर्व सदस्य यांच्या समवेत बांधावरची शाळा हा उपक्रम नुकताच भातशेती मध्ये लावणी करत राबविण्यात आला.
जि.प.सिंधुदुर्गचा बांधावरील शाळा हा उपक्रम मागिल दोन वर्षांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होता.कोरानाचा वेग मंदावला आणि शाळा सुरू झाल्या.शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी पुस्तकाचे धडे घेता – घेता शेतीचेही धडे घेणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने जि.प.शाळा ओटव नांदगाव व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा,सर्व सदस्य यांच्या समवेत बांधावरची शाळा हा उपक्रम घेतला.
भारत हा देश शेती प्रधान आहे.देशातील ९०% लोक शेतीवर आपली उपजिविका करतात.सहाजिकच बालवयात शेतीविषयी ची आवड निर्माण झाली तर निश्चितपणे आजचे विद्यार्थी शेतीचे धडे गिरवून आधुनिक शेतीकडे वळतील असा विश्वास शाळा व्यवस्थापन अध्यक्षा दिप्ती परब यांनी व्यक्त केला.यावेळी विद्यार्थी व मुख्याध्यापक श्री.आनंद तांबे सहकारी शिक्षिका रूपाली हुंन्नरे तसेच पालक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स