अखेर उद्धव ठाकरे यांचा पदत्याग..!
विधानपरिषद सदस्यत्वाचाही दिला राजीनामा.
मुंबईत दाखल होणाऱ्या बंडखोर आमदारांना कुठल्याही प्रकारचा विरोध न करण्याचे शिवसैनिकांना आवाहन.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट: गेले दहा दिवस रोलर कोस्टर घडामोडी अनुभवलेल्या शिवसेना पक्षाचे प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे फेसबुक लाईव्ह वरून जाहीर केले आहे. आपल्या कार्यकालाचा ही त्यांनी आढावा यावेळी त्यांनी घेतला.
याबरोबर त्यांनी आपण विधान परिषद सदस्यत्वाचा ही राजीनामा देत असल्याचे जाहिर केले. त्यामुळे उद्धव ठाकरे आता आमदारही राहणार नाहीत.
उद्या मुंबई येणाऱ्या बंडखोर आमदारांना कोणताही विरोध करु नये असे आवाहन ही उध्दव ठाकरे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)