<em>नॅशनल फिश वर्कर्स फोरम च्या वतीने सौ.ज्योती तोरसकर यांचा सत्कार..!</em>
जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीमध्ये मांडली मच्छीमारांची बाजू..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या एक पुरस्कार प्राप्त शिक्षिका, इतिहास अभ्यासक ,साहित्यिक व उत्कृष्ट वक्ता अशी सर्वांगीण ओळख असलेल्या सौ.ज्योती तोरसकर यांनी मच्छिमारांचीही बाजू मांडण्याची एक सामाजीक किमया साध्य केली आहे.
भारता सारख्या विकसनशील देशांनी सबसिडी बंद करण्याबाबाबत जागतिक व्यापार संघटनेची बैठक, जीनीव्हा(स्वित्झर्लंड)याठिकाणी दि.१२ जून ते १५ जून आयोजित केली होती. या बैठकीत भारतातील मच्छीमारांची बाजू मांडण्यासाठी संपूर्ण देशातून ३४ मच्छीमारांचे शिष्टमंडळ जीनीव्हा(स्वित्झर्लंड)गेले आहे.यामध्ये मालवण येथुन सौ.ज्योती रविकिरण तोरसकर यांचा समावेश होता.सदर शिष्टमंडळाने आणि भारत सरकारचे केंद्रीय व्यापार मंत्री आद.पीयूष गोयल यांनी भारताची बाजू जोरदार पणे मांडली होती.त्यामुळे जागतिक व्यापार संघटनेला मत्स्यव्यवसाय साठी सबसिडी बंदी बाबतचा निर्णय सात वर्षा साठी पुढे ढकलावा लागला.सदर निर्णय चा उपयोग छोट्या मच्छीमारांना आणि मत्स्यव्यवसायला मोठया प्रमाणात होणार आहे.
जीनेव्हा येथे जाऊन भारतातील छोट्या मच्छीमारांची बाजू प्रभावी पणे मांडल्याबद्दल काल दि.२९ जून रोजी मालवण दौऱ्यावर असलेल्या नॅशनल फिश वर्कर्स फोरम च्या राष्ट्रीय नेत्यांनी सौ.ज्योती तोरसकर यांच्या निवासस्थानी जाऊन समाधान व्यक्त केले आणि सत्कार केला.
यावेळी नॅशनल फिश वर्कर्स फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.लिओ कोलोसो, जनरल सेक्रेटरी श्री.ओलांसीओ सीमोइस,महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या सौ.उज्वला पाटील,श्री.किरण कोळी,श्री.रामकृष्ण तांडेल,श्री.राजन मेहेर व इतर पदाधिकारी यांचा सामावेश होता.यावेळी सौ.ज्योती तोरसकर यांनी आभार मानताना सदर परिषदेत मत मांडण्यासाठी श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष श्री.छोटू सावजी,श्री.बाबी जोगी,नारायण कुबल,धर्माजी आडकर तसेच रापण संघाचे श्री.दिलीप घारे यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण जीनेव्हा येथे ठाम बाजू मांडू शकलो असे सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)