ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
 शिक्षणप्रसार  करण्यात राजर्षी शाहू महाराजांचे मोठे काम ; ऍड. स्वाती तेली.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

 शिक्षणप्रसार  करण्यात राजर्षी शाहू महाराजांचे मोठे काम ; ऍड. स्वाती तेली.

प्रकाशन: 27 Jun 2022 07:09 PM
वाचन संख्या 39

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कणकवली येथील ऍड. स्वाती गोपाळ तेली यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याबद्दल मार्गदर्शन केले.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञाकाढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
लोककल्याणकारी राजा अशी उपाधी त्यांना जनतेने बहाल केली होती असे सांगितले.
यावेळी सिध्दार्थ तांबे,नरेंद्र तांबे,स्नेहल तांबे, सुभाष कदम (सचिव),नितीन कदम,सुगंध तांबे,अवंतिका तांबे,अनिल तांबे, प्रज्ञा कदम,शुभा जाधव,संदेश कदम आदीं सहभागी झाले होते.सूत्रसंचालन स्नेहल तांबे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स