ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
ह्युमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्गने जपली माणूसकी...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ह्युमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्गने जपली माणूसकी...!

प्रकाशन: 27 Jun 2022 11:18 AM
वाचन संख्या 164

चिंदर/विवेक परब :

आज सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक मुकीबधीर व्यक्ती व्यंकटेश जयराम कुरुबा हे चुकून मुंबई येथून कोकण रेल्वे मार्गाच्या गाडीत बसले. त्यांना आंध्र प्रदेश मधील अड ओवी याठिकाणी आपल्या गावी जायचं होतं. परंतु रात्री 3.00 वाजता सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला उतरले.
त्यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे मालवण तालुका निरीक्षक संदेश फाटक हे आपल्या नातेवाईकांना घरी घेऊन जाण्यासाठी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला आले होते. त्यांना ही बाब समजताच संदेश फाटक यांनी सकाळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना सांगितले. वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांच्या मुलाला मुंबई येथे संपर्क करून सर्व हकीकत सांगण्यात आली. त्यांच्या मुलाला मानसिक धक्काच बसला, परंतु त्यातून ते सावरले व आपल्या वडिलांना मुंबईला पाठवून द्यावयाची व्यवस्था करा. अशी विनवणी करू लागले. कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी कोकण रेल्वे कार्पोरेशन कणकवली चे वरिष्ठ खंड अभियंता श्री सुरेश गोविंद फडके यांना सर्व हकीकत सांगितली त्यानंतर वेगाने चक्रे फिरली सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर रमाकांत नाडकर्णी यांनी नेत्रावती एक्क्प्रेस मध्ये वयोवृद्ध नागरिक यांना बसवून दिले. त्यानंतर रत्नागिरी स्टेशनचे टी.सी. प्रसाद माळवदे यांना संतोष नाईक यांनी सर्व हकीकत फोन करून सांगितली, तेव्हा प्रसाद माळवदे यांनी संतोष नाईक यांना एवढेच सांगितले काळजी करू नका. जर त्या वयोवृद्ध व्यक्ती जवळ तिकिटाला पैसे नसतील मी स्वतः तिकीट काढून देतो. “पैसे राहू दे, माणूस आपल्या कुटुंबात पोचला पाहिजे” असे प्रसाद माळवदे म्हणाले…
कोकण रेल्वे कार्पोरेशनचे वरिष्ठ खंड अभियंता सुरेश गोविंद फडके, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर रमाकांत नाडकर्णी, रत्नागिरीचे रेल्वे टी.सी. प्रसाद माळवदे,तसेच ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे रत्नागिरी जिल्हा संघटक व कोकण रेल्वे कर्मचारी विकास पेजे, ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर
प्रोटेक्शनचे मालवण तालुका निरीक्षक संदेश फाटक, या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या सगळ्यांचे आभार कोकण विभागीय अध्यक्ष श्री संतोष नाईक व व्यंकटेश जयराम कुरुबा या कुटुंबाने मांडले. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच आपल्याला आपले वडील मिळाले अशी कुटुंबीयांनी आपली भावना व्यक्त केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 283
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 176

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स