ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
मुणगेचा सुपुत्र 'कोण होणार करोडपतीच्या' हॉट सीटवर..!(विशेष लक्षवेधी)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगेचा सुपुत्र 'कोण होणार करोडपतीच्या' हॉट सीटवर..!(विशेष लक्षवेधी)

प्रकाशन: 27 Jun 2022 11:09 AM
वाचन संख्या 76

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

देवगड तालुक्यातील मुणगे- बांबरवाडीचा सुपुत्र अक्षय सत्यविजय कदम या युवकाने सोनी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात भाग घेत २५ लाख रुपयांच्या बक्षिसा पर्यंत मजल मारली आहे.
कितीही हलाखीची परिस्थिती असली तरी न डगमगता आलेल्या संकटांना सामोरे जाणारे धैर्यवान स्पर्धकही या कार्यक्रमात सहभागी होत असतात. २७ जून रोजी रात्री ९ वा आपल्याला अक्षय हॉट सीटवर बसलेला दिसणार आहे. मुंबई- वडाळा येथे आपल्या कुटुंबियांसह राहणारा अक्षय कदम हा लेखक आहे. मध्यमवर्गीय घरातील अक्षयने घरच्यांच्या सुखासाठी आणि व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने या खेळात सहभागी घेतला.
अक्षय कदम हा सध्या कंटेट रायटर म्हणून काम करत आहे. आई-वडील आणि एक बहीण असा त्याचा परिवार आहे. अक्षयची आई घरकाम करते, तर वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला होते. पण कोरोना महामारीमुळे त्यांचं काम बंद झालं. अक्षय याची बहीण नायर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस टेक्निशियन म्हणून काम करते. शिक्षण घेता घेता अक्षयने आईस्क्रिमच्या दुकानात काम करत कष्ट करून पैसे मिळवण्यास सुरुवात केली. अक्षयच्या
आईने खूप कष्ट केले आहेत आणि याची जाणीव असल्याने अक्षयला आता तिला आराम द्यायचा आहे. अक्षयचे स्वतःची टूर कंपनी सुरु करण्याचे स्वप्न आहे. ज्यात तो लोकांना चांगल्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये घेऊन जाईल. त्याचबरोबर त्याला आईस्क्रीमचं दुकान सुरु करायचं आहे. आईस्क्रीमच्या दुकानात अक्षयने काम केल्यामुळे तिकडचा अनुभव त्याच्याजवळ आहे. मध्यमवर्गीय अक्षय २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला असल्याने त्याचे मुणगे गाव, तसेच मित्र परिवरातून अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स