मडूरेत आरोग्य शिबीरात ५५ रुग्णांची तपासणी..!
डिगवाडी मित्रमंडळाचे आयोजन..!
बांदा |राकेश परब :
मडूरा डिगवाडी ग्रामस्थ मित्रमंडळ आणि ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबीरात ५५ ग्रामस्थ व महिलांनी आरोग्य तपासणी करुन घेतली. यावेळी काही रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला.
मडूरा हायस्कूल सभागृहात आयोजित आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन मुख्याध्यापक दशरथ घाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच विजय वालावलकर, देवस्थान समिती अध्यक्ष आनंद परब, सामाजिक कार्यकर्ते सुमंत गावडे, पोलीस पाटील नितीन नाईक, डॉ. दत्तप्रसाद प्रभू, डॉ. ओमकार वेदक, डॉ. मिन्रवास परब, ग्लोबल फाऊंडेशनचे लक्ष्मण देसाई, उमेश गावडे, कोकण एनजीओचे समीर शिर्के, अजिंक्य शिंदे उपस्थित होते.
शिबीरात ब्लडप्रेशर, शुगर, नाक – कान- घसा, हिमोग्लोबीन, नेत्रतपासणी करण्यात आली. काही रुग्णांना आवश्यक सल्ला व मोफत औषध पुरवठा करण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी डिगवाडी मित्रमंडळाचे विनोद वालावलकर, विजय वालावलकर, मंदार वालावलकर, घनश्याम वालावलकर, भूषण प्रभू, विष्णू वेंगुर्लेकर, प्रतीक वालावलकर, प्रकाश वालावलकर, समीर बुगडे यांनी मेहनत घेतली. सुत्रसंचलन नितीन नाईक यांनी केले. शिबीरात ५५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)