पालघरमधील आदिवासी शाळामंध्ये कोकण संस्थेच्या वतीने शालेय दप्तर संच वाटप..!
बांदा | राकेश परब :
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शेकडो गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात येते त्यात सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, ठाणे, पुणे अशा अनेक जिल्ह्यात या वर्षीसुद्धा शालेय साहित्यासकट दप्तर वाटप करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यातील माकूणसार हायस्कूल, वेवर जिल्हा माध्यमिक शाळा आणि सांबरेपाडा शाळांना आज शेकडो दप्तर वाटप करण्यात आली.
खेड्यापाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे हे ओळखून दरवर्षी संस्था शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शालेय दप्तर तसेच स्कॉलरशिपचे वाटप करते. आज पालघर येथे केलेल्या शालेय दप्तर संच वाटप केल्याबद्दल माकूणसार शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोलवत, सुरेश कोळेकर, वेऊर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापीका कांचन पाटील, विनोद पाटील, सांबरेपाडा शाळेचे प्रमुख शिक्षक गजानन अनेमवाड, शांत सर तसेच सर्व शाळांमधील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कोकण संस्थेचे पालघर विभागीय अध्यक्ष श्री. अजित दळवी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण संस्थेचे मुंबई व्यवस्थापक सुरज कदम, प्रोग्राम मॅनेजर साक्षी पोटे, फरहान शेख, आदिती खरात, प्रीती पांगे, रोशन पडवणकर, भावेश मोरे, सचिन धोपट, आदीनी महत्वाची कामगिरी बजावली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)