ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
रमाकांत गावडे यांच्याकडून बांदा केंद्रशाळेतील दोन विद्यार्थिनींना दत्तक..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

रमाकांत गावडे यांच्याकडून बांदा केंद्रशाळेतील दोन विद्यार्थिनींना दत्तक..!

प्रकाशन: 26 Jun 2022 10:05 AM
वाचन संख्या 45

बांदा |राकेश परब :
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत बांदा पानवळ कॉलेजचे प्राध्यापक श्री रमाकांत गावडे यांनी‌ जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नंबर एक या शाळेतील दोन विद्यार्थिनींना दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श जोपासला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सावित्रीबाई दत्तक पालक योजना चालू केली आहे या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये भरून कायमस्वरूपी दत्तक पालक योजनेसाठी विद्यार्थिनी दत्तक घेता येते. श्री रमाकांत गावडे यांनी सहा हजार रुपयाचा धनादेश बांदा केंद्र शाळा मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोजकर यांचेकडे सुपुर्द केला.
यावेळी बोलताना प्राध्यापक गावडे यांनी बांदा शाळा जिह्यातील आदर्शवत शाळा असून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थीनी घेण्याचा आपला मानस असलयाचे सांगितले.आतापर्यंत बांदा केंद्र शाळेत ३० विद्यार्थिनी दत्तक पालक योजनेच्या लाभार्थी झालयाआहेत बांदा शाळेतील जास्तीत विद्यार्थीनींना हा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोजकर यांनी यावेळी सांगितले
यावेळी शाळेच्या वतीने गावडे आभार मानण्यात आले.यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षिका सरोज नाईक उपशिक्षक जे.डी.पाटील व पालक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स