शैक्षणिक वैभवाच्या टोपिवाला हायस्कूलमध्ये शिक्षणप्रसारक सत्यवान यशवंत रेडकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…!
सत्यवान रेडकर यांनी ओघवत्या शैलीत साधलेला संवाद व मार्गदर्शन ठरले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा विषय..
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोकणातील विद्यार्थी व पालकवर्गासाठी अथक झटणारे व तिमिरातूनी तेजाकडे संस्थेचे प्रणेते श्री.सत्यवान यशवंत रेडकर यांनी शैक्षणिकदृष्ट्या वैभवशाली अशा मालवणच्या सुप्रसिद्ध टोपीवाला हायस्कूलच्या मुलांना आज मार्गदर्शन केले.
25 जून2022 रोजी टोपीवाला हायस्कूल मालवण येथे इयत्ता बारावीच्या मुलांसाठी शासकीय स्पर्धा परीक्षा या विषयावर माननीय सत्यवान यशवंत रेडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते दुपारी 3 ते 6 या वेळामध्ये श्री. सत्यवान रेडकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये विविध स्पर्धा परीक्षा युपीएससी-एमपीएससी स्टाफ सिलेक्शन या परीक्षांच्या माध्यमातून दहावी बारावी आणि पदवी नंतर कोण कोणत्या परीक्षा देता येतात आणि त्यासाठी कोणत्या विषयांचा कसा अभ्यास करायचा यासंबंधी विस्तृत मार्गदर्शन केले तसेच इथून पुढे विद्यार्थ्यांनी संपर्कात राहिल्यास त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन आपल्याकडून केले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
भारत सरकारच्या सीमाशुल्क विभागामध्ये अधिकारी पदावर मुंबई येथे कार्यरत असणारे सत्यवान रेडकर मूळचे सिंधुदुर्ग मधील असून आपल्या कोकणातील मुलांनी शासकीय परीक्षांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी बनण्यासाठी अभ्यास कसा करावा यासंबंधी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या व्याख्यानप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षणतज्ञ श्री.डि.एस.खानोलकर तसेच प्राध्यापक श्री साटम, सौ आचरेकर मॅडम, श्री पवार सर आणि पालक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)