'रत्नाच्या आगारातील' लक्ष्मी ठरल्या पैठणीच्या मानकरी..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट: खासगी दूरचित्रवाहिनी झी-मराठीवर गाजत असलेल्या महा होम मिनिस्टर स्पर्धेच्या 11 लाखांच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत रत्नागिरीच्या वहिनी सौ. लक्ष्मी मंदार ढेकणे! रत्नागिरीच्या लक्ष्मीला ही पैठणी मिळाल्याबद्दल कोकणवासियांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
11 लाखांच्या पैठणीचा महाराष्ट्रभर गाजावाजा होता. महाराष्ट्रभरातून विविध केंद्रांमधून निवडून आलेल्या वहिनींतून अंतिम फेरीत ही अत्यंत मानाची पैठणी कोण पटकवणार? कोणत्या शहराला हा मान मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. अंतिम फेरीत महा मिनिस्टरमध्ये उत्तम खेळ करत रत्नागिरीच्या सौ. लक्ष्मी ढेकणे यांनी 11 लाखांच्या पैठणीवर आपले नाव कोरले. विजेता म्हणून नाव जाहीर होताच आणि महाराष्ट्रातील वहिनींचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या हस्ते हे महावस्त्र स्वीकारतानाचा आनंद अवर्णनीय असल्याचे सौ. लक्ष्मी यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)