ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मुणगे हायस्कुलला पाठ्यपुस्तके भेट..!

मुणगे हायस्कुलला पाठ्यपुस्तके भेट..!

प्रकाशन: 25 Jun 2022 09:59 PM
वाचन संख्या 272

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलच्या नववी व दहावीच्या विद्यार्थांना मुणगे गावचे सुपुत्र शांताराम सावंत, अभिजित सावंत यांच्या कडून शालेय पुस्तके भेट देण्यात आली.
आठवी पर्यंतच्या मुलांना पुस्तके मोफत मिळतात. परंतु नववी व दहावीच्या मुलांना सदर पुस्तके विकत घ्यावी लागतात. त्यामुळे गरीब परिस्थितीतील मुलांना सदर पुस्तकांचा वापर करता येणार आहे. सदर पुस्तके श्रीपाद बागवे यांनी संस्था व्यवस्थापक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांच्या हाती नुकतीच सुपूर्द केली.
प्रशालेच्या वतीने सदर मदतीबद्दल आभार मानण्यात आले. यावेळी यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष आनंद मालाडकर , पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, ग्रामपंचायत सदस्य सौ मालाडकर, सौ सावंत, श्रीपाद बागवे, प्रणय महाजन, प्रसाद बागवे, सौ गौरी तवटे, हरीश महाले, अंकित सावंत, एन जि वीरकर, सौ रश्मी कुमठेकर, झुंजार पेडणेकर आदी उपस्थित होते. प्रस्ताविक मुख्याध्यापिका एम बी कुंज तर सूत्रसंचालन सौ गौरी तवटे, आभार प्रशालेचे शिक्षक प्रसाद बागवे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स