वेध गणरायाचे..!
मालवण | सहिष्णू पंडित :
पाऊस आणि निरनिराळ्या शाळा सुरू होण्याचा हा जून महिना.याच काळात आणखी वेगळ्या शाळा सुरू होतात.अर्थात गणपती शाळा !!
सिंधुदुर्गात आता गणपतीशाळांची एकच लगबग सुरू आहे.
ओल्या मातीच्या गोळ्यातून चौसष्ट कलांचा अधिपती साकारण्यासाठी कुशल हात सज्ज आहेत.
वार्षिक रिवाजांच्या घरांतून आता आपल्या गणेशासाठी पाट जातील.यजमानांकडून बाप्पासाठी अगत्याचे निमंत्रणच जणू..!
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)