<em>त्रिंबक माजी सरपंचांचा प्रामाणिक पणा…..!</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : आधुनिक युगात माणूसकी, प्रामाणिक पणा संपत चाललेला आहे असा समज जेंव्हा प्रामाणिक पणा जपल्याचे उदाहरण दिसताच चुकीचा ठरतो. याचे एक ताजे उदाहरण आचरा येथे पहायला मिळाले आहे.
श्रावण सजा तलाठी नामदेव देसाई हे मालवण आडवली असा प्रवास करत असताना त्यांचे किंमती पाकिट हरवले. हे पाकिट त्रिंबक माजी सरपंच चंद्रशेखर सुतार यांना विस्कटलेल्या अवस्थेत आचरा-कणकवली रस्त्यावरील त्रिंबक साटमवाडी येथे मिळाले. श्री सुतार यांनी ते व्यवस्थित करुन आपल्याकडे ठेवले व देसाई यांच असल्याचे समजल्यावर त्यांना आचरा मंडल आँफीस येथे जाऊन परत केले पाकिट मध्ये नऊ हजार सहाशे रोख रक्कम तसेच किंमती कागद पत्रे होती.
पाकिट परत कळते वेळी आचरा मंडल अधिकारी अनिल परब, आचरा तलाठी काळे, चिंदर भटवाडी सजा तलाठी योगेश माळी, सामाजिक कार्यकर्ते बाबू कदम उपस्थित होते.
सुतार यांना अशाच प्रकारे अनेक वेळा अशा वस्तू मिळालेल्या आहेत त्या त्यांनी परत केल्या आहेत तसेच अनेक रस्ते अपघातात ते संकट मोचक म्हणूनही मदत करत असतात.
यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल त्यांची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)