शिवडावच्या चंदू पाटील यांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात
अबिद नाईक यांच्या माध्यमातून खाटा व गाद्यांची तात्काळ मदत
कणकवली / उमेश परब – सामाजिक कामात राष्ट्रवादी पक्ष हा नेहमीच आघाडीवर असल्याचे मूर्तिमंत उदाहरण कणकवली तालुक्यातील शिवडाव येथे पहावयास मिळाले असून 22 जुलै रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसाने संपुर्ण घरात पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने झालेली गैरसोय टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा कणकवली नगरसेवक अबिद नाईक यांच्या माध्यमातून शिवडावच्या चंदू पाटील यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
22 जुलै या दिवशी कोकणात झालेल्या पुराच्या हानीमध्ये कणकवली तालुक्यातील शिवडाव – तांबटवाडी येथे चंदू पाटील यांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे घरातील संपूर्ण जमीन ओली झाली व त्यांची घरामध्ये राहण्याची गैरसोय झाली. हि बाब शिवडावचे मा .उपसरपंच , साईनाथ सेवा मंडळ , शिवडावचे अध्यक्ष सतीश पाताडे व शिवडावमधील ग्रामस्थ यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा कणकवली नगरसेवक अबिद नाईक यांच्या कानावर घालताच त्यांनी स्वखचनि चंदू पाटील यांना २ खाटा व दोन गाद्या ताबडतोब घेऊन दिल्या .यावेळी चंदू पाटील व गावातील लोकांनी अबिद नाईक यांचे आभार मानले . त्यावेळी शिरसाठ गुरुजी व तानवडे सर यांच्या हस्ते खाटा व गाद्या शिवडाव मा. उपसरपंच तथा साईनाथ सेवा मंडळ शिवडाव अध्यक्ष सतीश पाताडे , महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष स्नेहल पाताडे , माजी तालुका राष्ट्रवादी प्रतिनिधी सचिन सदडेकर , सिद्धेश तानवडे , संदेश पाताडे , चंदू म्हसकर , लखन पाटील व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)