ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>अजय शिंदे यांचे शिक्षक आमदारांना निवेदन…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>अजय शिंदे यांचे शिक्षक आमदारांना निवेदन…!</em>

प्रकाशन: 23 Jun 2022 07:48 PM
वाचन संख्या 90

आजारांच्या सुचित ,स्वाईन प्लू,चिकन गुणिया,पोस्टकोविड 19चा समावेश करा….!

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांनी निवेदन देऊन केली मागणी..!

मालवण | सुयोग पंडित :
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यताप्राप्त रजिस्टर अग्रगण्य संघ असुन गेली कित्येक वर्षे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासन दरबारी आवाज उठवत आहे.
प्रस्तुत प्रश्नांसंबंधित आपण आमच्या मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर सभासदांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे व सचिव विजय मयेकर यांनी केली आहे.
(1)कोरोना काळात दिवंगत झालेल्या व महाराष्ट्र फेडरेशन ने सादर केलेल्या 257 शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय आर्थिक सानुग्रह अनुदान व अनुकंपा योजनेखाली शासकीय सेवेत नोकरीची संधी देण्यात यावी…

(2)वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची वय वर्षे 55 ते 58 तसेच सेवानिवृत्त शिक्षक याना सवलत देण्यात यावी…

(3)सेवांतर्गत प्रशिक्षण देताना आलेला ऑनलाइन अनुभव लक्ष्यात घेता प्रशिक्षणासाठी मुदत वाढवून देण्यात यावी,तसेच यापुढील प्रशिक्षण ॴॅफलाईन स्वरुपात असावे, प्रशिक्षण विनामुल्य असावे,या अगोदर घेतलेले प्रशिक्षण शुल्क प्रशिक्षणार्थींना परत करावे…

(4) ज्या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळात आंतरिक वाद असतील त्या संस्थेच्या शाळांतील वरीष्ठ व निवडश्रेणी पात्र शिक्षकांची नावे शासनाकडे पाठविण्याचे अधिकार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात यावे…

(5)डि.सी.पी.एस. /एन.पी.एस. धारक शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या खात्यावरील एकूण जमा रकमेचे विवरण ऑनलाइन उपलब्ध होण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात यावे.
(स्व वर्गणी +शासकीय हिस्सा +व्याज)

(6)शिवाय या योजनेच्या एकूण प्रतिवर्षी जमा झालेली वर्गणी व या वर्गणीच्या गुंतवणुकी विषयक अंमलबजावणी संबंधी सविस्तर शासकीय धोरण/नीती संबंधी खातेदारांना माहिती देण्यात यावी..

(7)एन.पी.एस.योजना ही “गुंतवणूक प्लॅन “या सदरात मोडणारी असल्याने या योजनेस “पेन्शन प्लॅन” म्हणता येणार नाही.म्हणून या नवीन पेन्शन योजने ऐवजी 1982 चीच जुनी प्रॉ.फंड व पेंशन योजना लागु करण्यात यावी…

(8)”महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम http://localhost/news/public/uploads/2015″1 मे http://localhost/news/public/uploads/2022 पासून राज्यात दि.18 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022 व “संवाद-दिन”दि.29 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022 च्या शासन आदेशानुसार कार्यान्वित झालेले आहे…
यामध्ये अपिल अधिकारी /कार्यान्वयन अधिकारी यांनी कालबद्ध कार्यवाही ने केल्यास त्यांच्या विरुद्ध शिक्षेची कोणतीही तरतूद आढळून येत नाही.यामध्ये दुरुस्ती व्हावी…

(9)पवित्र प्रणाली नुसार नियुक्ती करतांना शाळेतील “अर्धवेळ शिक्षक “यांच्या सेवा व पदास अंतर्भाव करणारे सॉफ्ट्वेअर विकसित करण्यात यावे..

(10)कार्यभार असलेल्या कला,क्रीडा,संगीत या सारख्या विशेष शिक्षकाची पदे संच मान्यतेत स्वतंत्र दर्शविण्यात यावी…

(11)सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार देय दुसरा व तिसरा हप्त्यापोटी तसेच सर्व प्रकारच्या थकित वेतन/नियमित वेतन /अघोषित शाळा -तुकड्यांना वेतन अनुदान आदी.अदायगी साठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा…

(12)वैद्यकिय प्रतिपूर्ती संबंधीच्या दि.19 मार्च http://localhost/news/public/uploads/2005 च्या आजारांच्या सूचित “चिकन गुणिया,”स्वाईन फ्लू “”पोस्टकोविड-19” यांचा समावेश करण्यात यावा…

(13) “शिक्षण सेवक” कालावधी पूर्ण झाल्यानंतर नियमित मान्यता दि.14 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2010 च्या शासन परिपत्रकानुसार त्वरित मिळाव्यात..

(14)प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल या पदांसाठी आवश्यक विद्यार्थी संख्येची अट शिथील करण्यात यावी…

(15)TET उत्तीर्ण शिक्षक याना नियमित वेतन श्रेणी मान्यता अविलंब मिळावी…

(16)शिक्षक/शिक्षकेतर यांची नियुक्ती संच मान्यते संबंधी दि.13 जुलै http://localhost/news/public/uploads/2020 व दि.4 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2020 च्या निकषांमधिल जाचक अटी दूर कराव्यात…

(17)B.L.O. च्या कामासाठी शिक्षक नियुक्ती करू नये. याविषयीचे धोरण सुलभीकरण करावे..

(18)नवीन शैक्षणिक धोरण अमलबजावणी करण्यासाठी नियुक्त समितीमध्ये महाराष्ट्र फेडरेशन प्रतिनिधीस प्रतिनिधित्व मिळावे…

(19)शाळा तिथे मुख्याध्यापक मिळावा,मुख्याध्यापक पद मान्यतेसाठी विद्यार्थी संख्या अट शिथिल करावी…

वरील मागण्यांचा विचार करुन,शासन दरबारी पाठपुरावा करावा व न्याय मिळवून द्यावा ही विनंती केली..
या प्रसंगी श्री.अजय मधुकर शिंदे
जिल्हा अध्यक्ष श्री.विजय लक्ष्मण मयेकर
कार्यवाह , उपाध्यक्ष संजय परब,दिनेश आजगावकर, दादा शिरहट्टी,कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघ अध्यक्ष प्रशांत चव्हाण, सचिव दशरथ काळे,उपाध्यक्ष सुजित गंगावणे ,मारुती माने,अशोक गिते,रंजन तेली, उत्तम मळगावकर, प्रेमचंद राठोड,सुरेश तुंबडा,बाळकृष्ण तुळसकर,वैभव कोंडस्कर, राजाराम तोरस्कर,योगेश सामंत,मंदार तोरस्कर, रामचंद्र खाकर,राजाराम तोरस्कर, रुपेश कर्पे,नरेश परब,दिपक हेब्बाळकर हे शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते…

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स