वेंगुर्ले येथे उद्या अंमली पदार्थ विरोधी जनजागरण…!
युवापिढीच्या सकारात्मक कार्याच्या नाडीचा ठोका चुकू नये म्हणून साजरा होणारा सप्ताह..!
‘आम्ही वेंगुर्लेकर’ चे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : दिनांक 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जागरण दिन म्हणून ‘समजावला’ जातो.
साजरा करावा असे त्या दिवसात काहीच नसते म्हणून समजावणे हे उचित् ठरते.
वेंगुर्ले येथे त्याच दिनाच्या सप्ताहाचे औचित्य साधून उद्या शुक्रवार 24 जून रोजी ‘आम्ही वेंगुर्लेकर’ तर्फे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त “जनजागृती व प्रबोधनात्मक चर्चासत्र” सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
अंमली पदार्थ विरोधी सप्ताह शासनामार्फत दिनांक 19 जून ते ते 26 जून या कालावधीत
आयोजित केला असून 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिन संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी, सेवन, विक्री व वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून आपली तरुणाई या नशेमध्ये गुंतत चालल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठीच व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीला वेळीच योग्य दिशा देण्यासाठी विशेष उपक्रम पोलीस प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने दिनांक 26 जून पासून सुरू करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ले येथे उद्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मान्यवर व तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार असून वेंगुर्लावासीयांनी या उपक्रमाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)