आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण भाजपकडून ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप…..!
चिंदर | विवेक परब :
भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने मालवण ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळे वाटप आरोग्य अधिका-यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगर सेवक दीपक पाटकर ,सुदेश आचरेकर ,गणेश कुशे ,पूजा करलकर, राजु बिडये,आबा हडकर, विनोद भोगावकर, मोहन वराडकर, बाबु कासवकर,ललित चव्हाण, विजू ढोलम आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)