ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रत्येकाने स्वतःच्या वाढदिवसा दिवशी एक झाड लावण्याचा संकल्प करा- श्रीकृष्ण परिट .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

प्रत्येकाने स्वतःच्या वाढदिवसा दिवशी एक झाड लावण्याचा संकल्प करा- श्रीकृष्ण परिट .

प्रकाशन: 23 Jun 2022 04:18 PM
वाचन संख्या 25

चौके | अमोल गोसावी :
” प्रत्येकजण सावलीसाठी नेहमी झाड शोधतो त्यामुळे झाड लावून ते मोठ करणे ही सुध्दा प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाड फक्त लावून चालणार नाही तर लावलेल्या झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करून ते झाड मोठे करणे ही सुध्दा आपलीच जबाबदारी आहे.
झाडे आपल्याला मोफत ऑक्सिजन देतात पण त्याचं महत्व कुणाला समजलं नव्हतं, कोरोना महामारीच्या काळात अनेकांना ऑक्सिजन शिवाय जीव गमवावे लागले त्यावेळी जीव वाचवण्यासाठी जेव्हा कृत्रिम ऑक्सिजन विकत घ्यावा लागत होता तेव्हा प्रत्येकाला झाडांचे आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या मोफत ऑक्सिजनचे महत्व निश्चितच समजले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची होणारी कत्तल थांबली पाहिजे. वृक्षतोडीमुळे भविष्यातील धोके टाळायचे असतील तर प्रत्येक विद्यार्थ्यांने तसेच प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या वाढदिवसादिवशी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे ” असे आवाहन मालवणचे वनपरीमंडळ अधिकारी, श्री. श्रीकृष्ण परिट यांनी काळसे हायस्कूल येथे वृक्षारोपण प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ काळसे व ग्रामपंचायत काळसे यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २१ जून रोजी काळसे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना वनविभागातील नोकरीसाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षा तसेच नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वनपरीमंडळ अधिकारी श्री. श्रीकृष्ण परिट यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हायस्कूल परिसरात वन अधिकारी श्री. परीट यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत परब , उपाध्यक्ष योगेश राऊळ , सचिव तथा सरपंच केशव सावंत, सहसचिव गजानन प्रभू, खजिनदार दाजी परब , संचालक तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी, निवृत्त तहसीलदार शरद गोसावी , राजन प्रभु , मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर , दिगंबर परब, पंढरीनाथ प्रभु, वन कर्मचारी अनिल परब , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनीही एक एक झाड लावले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक शिक्षक राजेंद्र परब यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स