एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड.
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातून अभिनंदनाचा वर्षाव.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण एनसीसी विभागाची माजी सिनिअर अंडर ऑफिसर गीतांजली चंद्रकांत चव्हाण हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणी व लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारे तिची ही निवड झाली आहे.
गीतांजली चव्हाण ही स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची माजी सिनिअर अंडर ऑफिसर असून, ती ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीअंतर्गत कार्यरत होती.
गीतांजली चव्हाण हिच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच अपघातात निधन झाले होते. कठीण परिस्थितीतही मिळवलेले हे यश तिच्या जिद्दीचे, कष्टाचे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. तिच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांसह संपूर्ण मालवण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे, असे लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी सांगितले आहे.
गीतांजली चव्हाण हिला महाविद्यालयाचे एनसीसी विभागप्रमुख तथा असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत व सर्व सहकारी शिक्षकांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, सहसेक्रेटरी संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, संचालक ॲड. समीर गवाणकर, डॉ. शशिकांत झांटये, डॉ. रामचंद्र काटकर, महादेव पाटकर, राजेंद्र खांडाळेकर, शैलेश पावसकर, माजी संचालक प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गीतांजली चव्हाण या माजी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. तसेच गीतांजली चव्हाण हिचे मालवणचे पोलीस अधिकारी, तहसीलदार गणेश लव्हे, मालवण नगरपरिषद नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व एनसीसी कॅडेट्स यांनी प्रशंसा करत अभिनंदन केले आहे.
५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेखर, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर तसेच बटालियनमधील संबंधित अधिकाऱ्यांनीही तिच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्...
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास...
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!'
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड.
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभाग...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या