उत्कर्ष मंडळ मुंबई , यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा विलवडे नं.२ शाळेत विद्यार्थींना, अंगणवाडी विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप..!
बांदा | राकेश परब :
उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा विलवडे नं.२ टेंबवाडी प्रशालेतील इ.१ते ४ सर्व विद्यार्थीना व अंगणवाडी विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वा्टप केले. स्कूलबॅग,वह्या,कंपास पेटी,पेन,चित्रकला वही इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विलवडे तील मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांचेतर्फे आपल्या आईच्या स्मरणार्थ शाळेला संगणक संच भेट दिला. तसेच जागतिक योगदिन शाळेत साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली.
या कार्यक्रमाच्या विलवडे आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. मणेरीकर,माजी उपसभापती कृष्णा सावंत उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी मंडळाचे रमण सावंत,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत,उपाध्यक्ष प्राजक्ता दळवी,प्रकाश दळवी,महेंद्र सावंत,सुभाष कानसे,संजय सावंत,सचिन सावंत,पूर्वा दळवी,धनश्री सावंत, माधुरी सावंत,समीता सावंत मानसी सावंत,जान्हवी सावंत ,वैष्णवी परब अंगणवाडी सेविका सीमा दळवी,मनाली दळवी, सर्व विद्यार्थी,अंगणवाडी विद्यार्थी,विविध समिती सदस्य,शाळेचे माजी विद्यार्थी, सर्व पालक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश काळे सर यांनी केले तर आभार सचिन शेळके यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड.
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची म...
यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..!
यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या म...
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश.
पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा.
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या