बांदा रोटरी क्लब कडून गरजूंना आर्थिक मदत..!
बांदा |राकेश परब :
रोटरी क्लब नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात बांदा गावात उपक्रम राबवत आहेत. बांदा दशक्रोशीतील गावातील लोकांना या उपक्रमाचा मोठा फायदा व्हावा म्हणून योग्य नियोजन रोटरी क्लब बांदा कडून करण्यात येत आहे. अशाच सामाजिक उपक्रमातून इन्सुली येथील श्रीमती उत्कर्षा लक्ष्मण कुडव या गरजू कुटुंबाला रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या कडून आपत्कालीन निधीतून आर्थिक सहकार्य करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब बांदा अध्यक्ष रो. मंदार कल्याणकर, रो.प्रमोद भाई कामत, सचिव रो. फिरोज खान, खजिनदार रो.बाबा काणेकर, सदस्य रो. शिवानंद भिडे, रो. सिद्धेश पावसकर, रो. स्वागत नाटेकर आदि उपस्थित होते. यापुढे बांदा रोटरी क्लब च्या माध्यमातून असे अनेक उपक्रम बांदा दशक्रोशीतील राबण्यात येणार असल्याचे बांदा अध्यक्ष रो.मंदार कल्याणकर यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)