ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
राजकीय भूकंप अपडेट..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राजकीय भूकंप अपडेट..!

प्रकाशन: 22 Jun 2022 10:00 PM
वाचन संख्या 32

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला- एकनाथ शिंदे.

वैभववाडी | प्रतिनिधी :
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली.

एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत म्हटलं की,गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला . यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अन्य एक ट्वीट करत त्यांनी पुढे म्हटलं की, पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं आहे असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स