<em>जिल्हा कार्यालयाच्या वतीने डाॅन बाॅस्को हायस्कूलमध्ये योगदिन साजरा..!</em>
ओरोस | सहिष्णू पंडित :
आज २१ जून हा दिवस भारताने योगदिन म्हणून जाहीर केला आहे.भारतीय योगविद्या अतिप्राचीन आणि सामर्थ्यशाली आहे.
या दिनाचे औचित्य साधून जिल्हा कार्यालयाच्या वतीने डाॅन बाॅस्को हायस्कूलमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके घेण्यात आली.या कार्यक्रमासाठी मा.जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मा.जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्रा.श्री.महेश धोत्रे आवर्जून उपस्थित होते.
या सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत शाळेचे फादर प्रिंसिपाॅल सेव्हीओ गोम्स आणि रेक्टर पाॅल डिसोजा यांनी केले.या उभयतांचे मार्गदर्शन या कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना लाभले होते.
350 विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग असलेल्या या योगसोहळ्याचे सूत्रसंचलन शेरील पिंटो मॅडम यांनी केले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)