दिव्यांग बांधवाच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व दिव्यांग बांधवांना छत्री वाटप..!
चिंदर/विवेक परब :
सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुऊद्देशीय शिक्षण संस्था कसाल व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल सिंधूदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 18/06/public/uploads/2022रोजी सकाऴी ठीक 11वाजता सिध्दीविनायक हाॅल कसाल येथे दिव्यांगाच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व दिव्यांग बांधवांना छत्री वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने व त्यानंतर उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला रोटरी क्लब चे अध्यक्ष डाॅ कोलते, साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे तसेच इतर उपस्थित रोटरी क्लब चे मान्यवर नविन बांदेकर, चव्हाण, घोगळे तसेच शामसुंदर लोट, निलम राणे, दिक्षा तेली, प्रितम मठकर, प्रकाश वाघ, भागिरथी शिंगाडे, श्रध्दा कदम, अनिता ढवळ, संगीता पवार आदि मान्यवर उपस्थित होते तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले संस्था अध्यक्षांनी मागील बारा वर्षात केलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमास 50हून अधिक दिव्यांग बांधव व त्यांची मुले बहूसंखेने उपस्थित होते संस्थेच्या वतीने प्रकाश वाघ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)