गोळवण नंबर २ शाळा येथे वह्या वाटप..!
सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ आप्पा घाडी यांचे दातृत्व..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
गोळवण गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री रामचंद्र उर्फ आप्पा घाडी यांच्या वतीने जि.प. शाळा गोळवण नंबर २ येथे मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी गोळवण गावचे सरपंच श्री सुभाष लाड , उपसरपंच श्री गावडे , श्री नाडकर्णी ,ग्रा.प.सदस्य श्री शरद मांजरेकर,प्राजक्ता चिरमुले,एकादशी गावडे,शालेय अध्यक्ष श्री वामन लाड, मुख्याध्यापक श्री संत्रे सर, अंगणवाडी सेविका नाडकर्णी मॅडम, आदिओम लाड, बाळकृष्ण भांडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)