न्यू इंग्लिश स्कुल मडुरा हायस्कूलचा शंभर टक्के निकाल..!
बांदा |राकेश परब :
न्यू इंग्लिश स्कुल मडुरा प्रशालेतून माध्यमिक शालांत परीक्षेत 63 विद्यार्थी प्रविष्ठ होऊन 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
प्रथम क्रमांक साक्षी चंद्रकांत पोखरे 90.40 टक्के, द्वितीय प्रथमेश सखाराम कासकर 90.20 टक्के, तृतीय कृष्णा शांताराम गावडे 85.80 टक्के यांनी क्रमांक पटकावला.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)