ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरेत मुंबईकर युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरेत मुंबईकर युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू..!

प्रकाशन: 18 Jun 2022 08:34 AM
वाचन संख्या 52

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

कालावल खाडीपात्रात मसुरे टोकळवाडी जेटी नजीक पोहण्यासाठी खाडीपात्रात उतरलेल्या मुंबई येथील देवेन्द्र जनार्दन जाधव ( ४० वर्ष) यांचे पाण्यात बुडून निधन झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दरम्यान जाधव यांच्या सोबत पाण्यात उतरलेल्या इतर चौघांनी पोहत किनारा गाठत आपला जीव वाचवण्यात यश मिळवले.  मसुरे मार्गचितड येथील एका फार्म हाऊस वर हे सर्व जण थांबले होते. पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने देवेंद्र जाधव आपला जीव वाचवू शकला नाही. शवविच्छेदन  मसुरे आरोग्य केंद्र येथें रात्री उशिरा करण्यात येणार आहे. रात्री ८ च्या सुमारास मृतदेह पाण्यात सापडला.मृतदेह शोधण्यासाठी बाबा सय्यद, इस्माईल सय्यद, कुणाल हडकर,रोहित नार्वेकर, राजू मुणगेकर आदींसह ग्रामस्थांनी सहकार्य केले.पोलीस निरीक्षक श्री विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलिस कॉन्स्टेबल पी. बी.नाईक,  विवेक फरांदे अधिक तपास करत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स