मडूरे येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर..!
बांदा |राकेश परब :
मडुरा डिगवाडी मित्रमंडळ, सावंतवाडी व ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १९ जून रोजी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, कान- नाक- घसा तपासणी होईल. मडुरा हायस्कूल सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान हे शिबीर चालणार आहे. शिबीरात तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन मडूरा डिगवाडी मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)