<em>जनता विद्या मंदिर त्रिंबक शाळेचे सुयश……..!</em>
चिंदर/विवेक परब :
मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेचा मार्च http://localhost/news/public/uploads/2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला असून कुमार दुर्गेश सुशील घाडीगावकर प्रथम क्रमांकाने, कुमारी मंदिरी रमेश मुणगेकर व्दितीय तर कुमारी सानिका उल्हास सावंत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रशालेतून एकूण 32 विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्या पैकी सर्व विद्यार्थी प्रविष्ट झाले. शाळेच्या निकालाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रवीण घाडीगावकर तसेच संस्था अध्यक्ष श्री प्रताप बागवे, तसेच उपाध्यक्ष श्री प्रफुल्ल प्रभू, कार्यवाह श्री सुरेंद्र सपकाळ, तसेच संपूर्ण माध्यमिक शिक्षण समिती कार्यकारिणी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)