व्ही.एन.नाबर बांदा प्रशालेची दहावीची १००% निकालाची परंपरा कायम सर्व विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण..!
बांदा |राकेश परब :
येथील श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही एन नाबर प्रशालेचा दहावीचा या वर्षी १०० % निकाल लागला.दहावी परीक्षेसाठी एकूण ३५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी सर्वच्या सर्व ३५ विद्यार्थी विशेष श्रेणीत, उत्तीर्ण झालेत.प्रशालेची कु. श्रुती वसंत राऊळ कु.हिने 96.80%गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला.कु. तन्वी मनोज महाबळ हिने 94.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु.वैभवी प्रमोद धुरी व कु. संकेत प्रेमानंद देसाई यांनी 94.40% गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.कु पायल संतोष गावकर हिने93.20% तर कु.मिताली भालचंद्र कोकाटे हिने 93% गुण मिळवून अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.
संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक ,विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)