ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँन्ड ॲग्रिकल्चरच्या कोकण पर्यटन समिती प्रमुख पदी श्री विष्णू मोंडकर यांची निवड..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँन्ड ॲग्रिकल्चरच्या कोकण पर्यटन समिती प्रमुख पदी श्री विष्णू मोंडकर यांची निवड..!

प्रकाशन: 14 Jun 2022 04:51 PM
वाचन संख्या 143

चिंदर/ विवेक परब :

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँन्ड ॲग्रिकल्चर ही संस्था व्यापारी वर्गाची शिखर संस्था असून या संस्थेने राज्य व केंद्र सरकारच्या व्यापारी वर्गास आवश्यक असलेल्या अनेक शासकीय पॉलिसी बनविण्यामध्ये मध्ये मोठे योगदान आहे चेंबरच्या माध्यमातून राज्यात उद्योग व्यवसाय बरोबर महाराष्ट्र राज्य पर्यटन क्षेत्रात अग्रेसर व्हावे यासाठी चेंबरचे नूतन अध्यक्ष श्री ललितजी गांधी यांच्या सुचनेप्रमाणे राज्य पर्यटन समिती गठीत करण्यात आली महाराष्ट्र पर्यटन समिती अध्यक्ष पदी श्री संतोषजी तावडे यांची निवड करण्यात आली असून पर्यटन कार्यकारणी सदस्य म्हणून कुडाळ येथील व्यावसायिक श्री राजन नाईक यांची निवड करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात काम करत असताना संपूर्ण राज्याचे प्रश्न वेगळे असून कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी असलेला पर्यटन व्यावसायिक मूलभूत व्यावसायिक सुख सुविधांसाठी झगडत असल्याचे चेंबर अध्यक्ष श्री ललितजी गांधी यांच्या लक्षात आल्याने कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोकण पर्यटन समिती गठीत करण्यात आली यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या राज्यातील तीन जिल्ह्याचा समावेश असून गोवा राज्य व बेळगावचा समावेश आहे या समितीच्या प्रमुख पदी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या जिल्ह्यातील करत असलेल्या कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांची चेंबर अध्यक्ष श्री ललितजी गांधी यांनी निवड केली असून मालवण येथे दिनांक 13/6/public/uploads/2022 झालेल्या पर्यटन चर्चासत्र कार्यक्रमात महाराष्ट्र्र चेंबर कोकण रिजन अध्यक्ष श्री राजू पुनाळेकर यांच्या उपस्थितीत केंद्रीय पर्यटन मंत्री श्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री विष्णू मोंडकर यांनी सांगितले की कोकणातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिकांच्या कित्येक वर्षे प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 298
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 176

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स