उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून बेकायदेशीर दारु साठा केला जप्त...!
बांदा | राकेश परब :
वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा पटेलवाडी येथे गावच्या हद्दीत एका काजू फॅक्टरीच्या समोरील बाजूस एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारु साठा ठेवण्यात आला होता. सदर छापा घालून अवैध मद्याचा साठा जप्त करण्यात आला . राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक , कोल्हापूर विभाग , छापा टाकून मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यामध्ये कागदी पुठ्ठयाच्या बॉक्समध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्य विविध ब्रॅन्डच्या १८० मिलीच्या ९६९६ सिलबंद काचेच्या बाटल्या व ७५० मिलीच्या १००८ सिलबंद प्लॅस्टीक बाटल्या असे एकूण २८६ बॉक्स मिळून आले . एकूण मुद्देमाल रू . २०,२१,७६० / – चा जप्त करण्यात आला असून आरोपीत इसम लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर रा . गाडी अड्डा वेंगुर्ला ता . वेंगुर्ला , जि . सिंधुदुर्ग याला फरार घोषीत करण्यात आले . सदरची कारवाई निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , विभागीय भरारी पथक , कोल्हापूर विभाग , कोल्हापूर या पथकाने मा . विभागीय उपआयुक्त , राज्य उत्पादन शुल्क , कोल्हापूर श्री . बी . एच . तडवीसो , यांचे आदेशाने निरीक्षक श्री . पी . आर . पाटील , निरीक्षक श्री . अ . अ . पाडळकर , दुय्यम निरीक्षक , श्री . आर . जी . येवलुजे , दुय्यम निरीक्षक श्री . एस . एस . गोंदकर , दुय्यम निरीक्षक श्री . वायदंडे , सहायक दुय्यम निरीक्षक श्री . आर . डी . ठाकूर व कॉन्स्टेबल सर्वश्री सुशांत बनसोडे , विलास पवार , अमोल यादव , दिपक कापसे , एच . आर . वस्त यांनी केली . पुढील तपास श्री . आर . जी . येवलुजे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क , विभागीय भरारी पथक , कोल्हापूर करीत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)