ताज्या बातम्या
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
कोळपेतील थोडगे कुटुंबीयांचे आमदार नितेश राणे यांनी केले सांत्वन..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कोळपेतील थोडगे कुटुंबीयांचे आमदार नितेश राणे यांनी केले सांत्वन..!

प्रकाशन: 14 Jun 2022 02:33 PM
वाचन संख्या 85

बहिण भावाच्या अपघाती मृत्यूने गाव सुन्न…!

वैभववाडी / नवलराज काळे : मोटरसायकल व काँक्रीट मिक्सर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कोळपेतील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. आमदार नितेश राणे यांनी थोडगे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, माजी सभापती बाळा हरयाण, उंबर्डे सरपंच एस. एम. बोबडे, रज्जब रमदुल व कोळपे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
शनिवारी सकाळी सोनाळी येथे मोटरसायकल व मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात मुख्तार महम्मद थोडगे वय 18 रा. कोळपे व मोमीना उस्मानगणी नावळेकर वय 22 रा. नांदगाव या बहिण-भावाचा जागीच अंत झाला होता. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला तर कोळपे गाव सुन्न झाला होता. आमदार नितेश राणे यांनी मयत मुख्तार याचे वडील महम्मद थोडगे व कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स