शिरगाव कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के..!
शिरगाव/संतोष साळसकर :
मार्च http://localhost/news/public/uploads/2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत शिरगाव कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला असुन या प्रशालेने निकालाची परंपरा कायम राखली आहे या प्रशालेतील वाणिज्य व कला शाखेतून १६६ विद्यार्था बसले होते ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला.
या प्रशालेतील वाणिज्य शाखेतून १२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये सायली चंद्रकांत शिवलकर ८६.३३ टक्के प्रथम क्रमांक, ओमकार अशोक राणे ८२.८३ टक्के द्वितिय क्रमांक, साक्षी विजय घाडी ७९.५०टक्के तृतीय क्रमांक मिळाला
कला शाखेतून ४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये वैष्णवी धाकलू डवरी व श्रेयस संतोष बाणे दोघांना ७०.५० टक्के प्रथम क्रमांक, केतन संजय कोकरे ६७ टक्के द्वितीय क्रमांक, नितीन मारुती गराडे ६५.८३ टक्के तृतीय क्रमांक मिळाला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष अरुण कर्ले , संस्थेचे संचालक, सर्व पदाधिकारी ,चेअरमन , प्राचार्य एस एन अत्तार सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)